Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकै.भांगडिया स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबीर संपन्न 

कै.भांगडिया स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबीर संपन्न 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : हरिशकुमार कौशल्यादेवी बालकिशन भांगडिया यांच्या स्मृति प्रित्यर्थ कौशल ग्रूप, रामदेवबाबा सोशल ग्रूप, महेश सेवा संघ रक्ताचे नाते, लायन्स क्लब ऑफ़ आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तू उद्योग नगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. Kai. Bhangdia memorial health checkup camp concluded 

यावेळी १५६ जणांनी रक्तदान केले. ८४ जणांची नेत्रतपासणी,८७ जणांची दंत तपासणी,४० जणांची हिमोग्लोबिन, तर ३२ जणांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली. तर ९८ जणांनी नेत्रदानाचा, ११ जणांनी देहदानाचा, १७ जणांनी अवयवदानाचा संकल्प केला.

सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगडिया यांच्या पुढाकाराने भोसरी येथील पताशीबाई लुंकड अंध विद्यालयात ११० विद्यार्थ्यांना टी शर्ट, मिठाई आणि अन्नदान केले. चिंचवड येथील तात्या बापट स्मृती सभागृहास तेल, डाळ, असे जीवनावश्यक वस्तू देण्यात आले.

आरोग्य तपासणी शिबीरप्रसंगी आमदार महेश लांडगे, कार्तिक लांडगे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ.शाळिग्राम भंडारी, भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक राहुल भोसले, समीर मासूळकर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर, योगेश बाबर, ॲड.सुशील मंचरकर, सुरेश गादीया, अजय लड्डा, सचिन नावंदर, मेघराज राठी, अनिल लखन, धनराज भाटी, महेश बंगा, नितीन गट्टानी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, मेघना महाजन, रेखा शहा, मुख्य आयोजक अनिल भांगडिया आदी उपस्थित होते.

भांगडिया यांनी रक्तदानाचा यज्ञ गेली २७ वर्षापासून तेवत ठेवला आहे. त्यांनी स्वतः १२५ वेळा रक्तदान करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. असे उद्गार अमित गोरखे यांनी यावेळी काढले.

भांगडिया म्हणाले कि १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्ती वर्षातून ४ वेळा रक्तदान करू शकतो. रक्त निर्मितीचा कुठेही कारखाना नाही किंवा पैशाने रक्त निर्मिती होत नाही. निरोगी व्यक्तीने वर्षातून ४ वेळा रक्तदान केल्यास ४७ वर्षांत १८८ वेळा रक्तदान होईल. यातून ५६४ रुग्णांना जीवनदान मिळते. रक्तदान केल्याने पेशींची संख्या वाढते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्षम होते. रक्तदानामुळे रक्ताचा तुटवडा नाहीसा होतो आणि एक माणुसकी जपली जाते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय