Saturday, October 1, 2022
Homeजुन्नरजुन्नर : उच्छिल येथे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जुन्नर : उच्छिल येथे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जुन्नर : स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांस हर घर तिरंगा या शासनाच्या योजनेअंतर्गत शाळा पातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धा, माजी विद्यार्थी यांसकडून क्रीडा साहित्याचे वाटप, शाळेसाठी वै. बायजाबाई किसन नवले यांच्या स्मरणार्थ सचिन नवले, बाळासाहेब नवले, उमेश नवले आणि सुरेश नवले यांच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच संदेश नवले यांच्याकडून सर्व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप तसेच कु. शिवांश सचिन नांगरे या बाळाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्ताने शाळेसाठी पाच भिंतीवरील घड्याळे व खाऊ देण्यात आला. तसेच पेसा ग्रामपंचायत उच्छिल यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उच्छिल आणि ग्रामदैवत श्री क्षेत्र केदारेश्वर मंदिर परिसरात विविध प्रकारची सुंदर, आकर्षक व सुभोभित अशी वृक्षलागवड करण्यात आली.


तसेच बोलक्या भिंती व समूह साधन केंद्र इमारत दुरुस्ती याकरीता 75, 000 रुपयांचा निधी तर शौचालय दुरुस्ती साठी विशेष योगदान देणाऱ्या नूतन ग्रामसेविका साबळे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला. तर पेसा ग्रामकोष समिती उच्छिलचे अध्यक्ष श्री. पोटे आणि सदस्या मंदाताई बगाड तसेच या सर्वाचे क्षेय देणारे गावचे पोलीस पाटील सुनिल बगाड यांचेही आभार मानले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षस्थानी उच्छिल गावाचे तरुण तडफदार युवा उद्योजक संदेश नवले हे होते तर शाळेचे ध्वजारोहन शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नवले यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजाला पुष्पहार गणपत बांबळे माजी चेअरमन उच्छिल सोसायटी यांनी अर्पण केले तर श्रीफळ बबन केंगले नूतन चेअरमन यांच्या हस्ते केले.


प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचे ध्वजारोहन सुनिल बगाड पोलीस पाटील यांच्या हस्ते झाले तर पुष्पहार अर्पण नितीन भालेराव, अर्चनाताई शिंदे ग्रामपंचायत सदस्य तर श्रीफळ बापू नवले संचालक, एकनाथ नवले व हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले.

ग्रामपंचायत कार्यालय उच्छिल येथील ध्वजारोहण बबन मारुती नवले यांच्या हस्ते करण्यात आले. तर पुष्पहार अर्पण विलास नारायण नवले यांच्या हस्ते झाले. श्रीफळ शांताराम शिंदे यांनी वाहिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये बालसभा आयोजित करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सुरेख भाषणे केली तर तालुकास्तर स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव सन 2022 मध्ये सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गटात द्वितीय क्रमांक आल्याबदल सर्वांनी कौतुक व त्याचा सत्कार करण्यात आला. यानंतर मनोगतात सुरेश नवले, शरद नवले, ग्रामसेविका साबळे मॅडम, पुष्पलता पानसरे केंद्रप्रमुख उच्छिल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश नवले यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले. शाळेविषयी गौरवोध्वार काढले आणि सर्वांना स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यानिमित्ताने संगणक लॅब साठी निधी 1 लाख 25000 रूपये इतका ठेवण्यात आला तर नव्याने तयार करण्याकरीता लिलावातून 50,000 रुपये निधी शाळेसाठी रोख स्वरूपात देण्यात आला तर शाळेतील अन्वर सय्यद, सुभाष मोहरे, स्मिता ढोबळे, लिलावती नांगरे आणि आरती मोहरे या पाचही शिक्षकांच्या वतीने प्रत्येकी पाच प्रमाणे 25,000 रुपये देण्यात आला असून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नवले यांच्या वतीने 7,001 रुपये जाहिर करण्यात आले तर उर्वरीत रक्कम शाळेतील माजी विद्यार्थी गावातील मान्यवर यांना आवाहन केले गेले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याकरीता चंदकांत शिंदे व अर्चनाताई शिंदे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्याचे जाहिर करण्यात आले. या निमित्ताने ज्या सन्माननीय मान्यवरांची शाळेसाठी विशेष योगदान आहे अशा व्यक्तीमध्ये संदिप नवले, रोहिदास भालेराव, सोमनाथ केंगले यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती रामदास बाबजी नवले शिक्षणप्रेमी सदस्य तर गणपत भालेराव उपाध्यक्ष , सदस्य रविंद्र भालेराव, संपत नवले, सचिन नवले, कांचन नवले, सविता नवले, रेश्मा केंगले, शोभा नवले सदस्या शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तसेच गावातील प्रमुख पाहुणे जगदिश नवले, माजी अध्यक्ष सागर बांबळे, प्रविण नवले, निलेश नवले, सावकार नवले, मयूर शिंदे, कुंदन बगाड, बबन नवले, लक्ष्मण बगाड, आत्माराम शिंदे, विठल नवले, सुभाष आढारी, जयानंद नवले, तान्हाजी नवले, सुनिल नवले, विकास शिंदे, किशोर नवले, अशोक भालेराव, अंगणवाडी सेविका संगिता शिंदे व मदतनीस योगिता केंगले आदी मान्यवर तरुण मंडळ उपस्थित होते.

तसेच डॉ. सुप्रिया कानडे वैद्यकिय अधिकारी आरोग्य उपकेंद्र, आरोग्य सेविका सुनिता भागवत व तंबाकुची प्रतिज्ञा देऊन उपस्थित सर्वांना प्रेरित करणारे आरोग्य सेवक विवेक अत्रे व स्टाफ उपस्थित होता.

Lic Kanya Yojana


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय