Saturday, October 1, 2022
Homeशहरसाता समुद्रापारही युवक युवतींची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची धूम

साता समुद्रापारही युवक युवतींची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची धूम

पिंपरी : परदेशात सातासमुद्रापार राहणाऱ्या शिक्षण नोकरी, व्यवसाय निमित्त जर्मनीत वास्तव्यास असलेल्या पिंपरी चिंचवड मधील युवक युवतींनी मानहाइम या जर्मनीतील मोठ्या शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. पिंपरी चिंचवड, कराड, सातारा अशा विविध शहरातील तरुण मुले, मुली जर्मनीत नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी मानहाईम शहरातील लुईसनपार्क येथील गार्डन मध्ये आनंद मेळावा आयोजित केला होता. स्वातंत्र्य वीरांना स्मरणात ठेऊन, भारत मातेची प्रतिज्ञा घेऊन स्वातंत्र्य समरातील शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांनी तिरंग्यास प्रणाम करून आगळा-वेगळा उपक्रम म्हणून देशभक्तीपर कविता, गाणी, वाद्यवादन आणि समूह नृत्य-अविष्कारांचे सादरीकरण केले.

पिंपरी चिंचवड, कराड, सातारा औरंगाबाद, नाशिक शहरातील उच्च शिक्षित युवक – युवती दरवर्षी एकत्र येऊन स्वातंत्रदिन साजरा करतात. अमृता कडुलकर, ओंकार पाटील, मनाली शेट्टी (पिंपरी चिंचवड),सुमित कदम(कराड), सौरभ कुलकर्णी(सातारा) सह सचिन नारायणन(गुजरात) इ. विद्यार्थी – युवकांनी त्यांच्या अमृत महोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ पालकांना शेअर केले आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय