Monday, September 25, 2023
Homeजुन्नरपिंपरी चिंचवड शहरात उत्साहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

चिखली प्राधिकरण-दत्त साई प्रतिष्ठानच्या वतीने ध्वजारोहण

पिंपरी चिंचवड
: चिखली प्राधिकरण येथील राजे शिवाजीनगर सेक्टर १६, संत शिरोमणी उद्यानाच्या बाजूला दत्त साई प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते.

दत्त साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी या ध्वजारोहणाचे आयोजन केलं होते. सुरुवातीला अजित गव्हाणे आणि कविता अल्हाट या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला दत्त साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, गणेश ठोंबरे, ज्योती गोफणे, अंजुषा नेरलेकर, किशोर दुधाडे, बाळासाहेब मुळे, लिटल स्टार स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तसेच राजे शिवाजीनगर येथील सोसायट्यांचे चेअरमन आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल मध्ये ध्वजारोहण

घरकुलमध्ये साई चौक येथे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकवसंतराव बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणी घरकुल मधील जपानला एमबीए साठी निवड झालेला 92 लाखाची स्कॉलरशिप मिळवलेला धम्मरत्न गायकवाड याचा यावेळी बाबर साहेबांच्या हस्ते घरकुलकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी के. जी. चावला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. मल्हार ढोल ताशा पथक यांनी ध्वजारोहण वेळी वादन केले. अमृत महोत्सव निमित्त चांगली सेल्फी सजावट करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे आयोजन कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलिस व नागरिक मित्र व शाखा क्रमांक १ घरकुल विभाग व अशोक मगर मित्रपरिवार यांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलिस व नागरिक मित्र व शाखा क्रमांक १ घरकुल विभाग व अशोक मगर मित्रपरिवार यांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आले होते.

चिखली पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने चिखली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चिखली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर आणि सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगलाताई गवळी आणि मुळशी तालुका अध्यक्ष नामदेव चौगले उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात वसंत बाबर यांना मंगलाताई गवळी यांनी राखी बांधून केली. या प्रसंगी राजेंद्र चकटे, कुंडलिक गवळी, राहुल गवळी, गौरव मांडे, सविता थोरात, सुरेखा चकटे, अनिता गायकवाड, गीता कोरे आणि अमृता भोर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

महात्मा फुलेंनगर येथे जेष्ठांची मानवंदना

‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान’ च्या ‘श्री गणेश मंदिर’ येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका स्वतंत्रसेनानी पत्नी श्रीमती मुक्ताताई गजानन काकडे व उद्योजक सुनील बर्गे या मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजास राष्ट्रगीतासह मानवंदना समर्पित करण्यात आली. याप्रसंगी विलास रूपटक्के यांनी संचलन केले. यशवंत कण्हेरे, विश्वास सोहनी, निर्मला धकाते, विद्या जोशी, वंदना सोहोनी यांनी मनोगत व्यक्त केले व शिवानंद चौगुले यांनी आभार व्यक्त केले.

Lic


शाहुनगर येथे ध्वजारोहण

चिंचवड येथील शाहूनगर मध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ, साई मंदिर, अष्टविनायक गणेश मंदिर, यांच्या वतीने ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रियाताई चांदगुडे, भाजपा उपाध्यक्षा पि.चिं.शहर यांचे हस्ते ध्वजारोहण केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरी कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र दिन साजरा

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभरात अमृत महोत्सवाची हर घर तिरंगा अभियान चालू आहे. घरोघरी देशभक्ती जागृत होत आहे, यातच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकाराम नगर पिंपरी येथे माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, माजी नगरसेविका सुलोचना धर-चिलवंत, जेष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के उपस्थित होते.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने माजी केंद्र संचालक सुरेख पवार यांच्या हस्ते मंडळातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. लहान मुलांनीही भक्ती गीते गायली. यावेळी केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी मंडळाच्या शिवण काम वर्ग, हस्तकला वर्ग, शिष्यवृत्ती योजना, पाठयपुस्तक योजना, अशा अनेक कामगारासाठी व कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती दिली तर त्यांनी केंद्रात येऊन जास्तीत जास्त कामगारांनी कामगार कल्याण मंडळाचे सभासद होण्याची आवाहन ही केले.

जेष्ट पत्रकार शिवाजीराव शिर्के म्हणाले कि, माझे भाग्य आहे कि मी लहान असताना देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन पाहण्याचा योग आला व आज 75 वा अमृतमोहत्व साजरा करण्याचे भाग्यमला मिळाले. यावेळी माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेविका सुलोचना धर-चिलवंत, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, जेष्ठ पत्रकार व गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती शहर अध्यक्षा संजना करंजवणे, माजी केंद्र संचालक सुरेश पवार, केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, संगिता क्षीरसागर, ह.भ.प यादव तळोले, ह.भ.प.शामराव गायकवाड, शंकर नानेकर, गुणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे, किरण कोळेकर, रविंद्र राणावत, तृप्ती राणावत, शैलेजा आवडे सह अनेक कामगार उपस्थित होते.

चिंचवडगाव-गोखले वृंदावन गृहसंकुलमध्ये ध्वजारोहण

चिंचवड गाव चाफेकर चौकातील गोखले वृंदावन गृहसंकुलातील पदाधिकारी किरण येवलेकर, अतुल आंबेकर, भुपेंद्र केतकर यांचेसह दिलीप तासे, वसंत रानडे, सुभाष कर्णिक, सोमनाथ टेंबुलकर आदी मान्यवर जेष्ठ नागरिकांनी ध्वजारोहण करून घरोघरी तिरंगा रोहण केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic Kanya Yojana

संबंधित लेख

 


लोकप्रिय