Friday, November 22, 2024
Homeग्रामीणजुन्नर : तब्ब्ल 27 वर्षांनी भावूक वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

जुन्नर : तब्ब्ल 27 वर्षांनी भावूक वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग

जुन्नर / प्रा.प्रविण ताजणे : कै. कृष्णराव मुंढे विद्यालयात जुन्नर येथील सन 1996-97 मधील इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन रोकडे फार्म निरगुडे ता.जुन्नर येथे करण्यात आले होते. तब्बल 27 वर्षांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यानमाला, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, गरीब व गरजू विद्यार्थी दत्तक योजना, शालेय परिसरात वृक्षारोपण, माजी विद्यार्थी संघाची स्थापना असे विविध उपक्रम पुढील काळात राबविण्याचा मानस विद्यार्थ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

मैत्री ग्रूपमधील दिवंगतमाजी विद्यार्थ्याना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आपल्या गुरुजनांना सन्मानीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात काम करत आहोत व कसे यशस्वी झालो याविषयीची माहिती सर्वांना दिली.

विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी कार्यरत असून काही उच्च पदावर अधिकारी असल्याचे ऐकून शिक्षक अगदी भारावून गेले होते. शिक्षकांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना आजही तुम्ही कसे संस्कारक्षम जीवन जगले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या स्नेह मेळाव्या प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक किसन दूरगुडे, माजी मुख्याध्यापक विलास उंडे, प्रकाश चौधरी, माजी शिक्षक व प्रवचनकार गोविंद हिंगे, कृष्णा नाईकडे तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब कवडे आदी गुरुजन उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय मुंढे, निलेश कळंबे, प्रवीण ताजणे, प्रवीण कबाडी, सुरेखा दप्तरे, संतोष सरजीने, अरुण ठाकर, पांडुरंग बगाड, नारायण मराडे, अनिल मुंढे, गणेश हिले आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा दप्तरे यांनी, सूत्रसंचालन शंकर घोडे यांनी तर आभार रामदास सुपे यांनी मानले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

संबंधित लेख

लोकप्रिय