Saturday, May 18, 2024
Homeराज्यआझाद मैदानात १०० व्या दिवशी प्राध्यापक कर्मचाऱ्यांचा अनुदानाचा लढा सुरुच; राज्यव्यापी आंदोलनाचा...

आझाद मैदानात १०० व्या दिवशी प्राध्यापक कर्मचाऱ्यांचा अनुदानाचा लढा सुरुच; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

१९ हे विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : ७८ वरिष्ठ पारंपारिक महाविद्यालयांना १००% अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज १०० दिवस पुर्ण झाले. आंदोलनाच्या १०० व्या दिवशी कृती समितीच्या वतीने आझाद मैदानावरील आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व सहसंचालक कार्यालय येथे लोकशाही मार्गाने एक दिवसीय निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतल्याची माहीती डॉ.भाऊसाहेब झिरपे यांनी दिली आहे.

२४ नोव्हेंबर २००१ पुर्वीच्या ७८ वरिष्ठ पारंपारिक महाविद्यालयाना १००% अनुदान मिळावे या मागणीसाठी आजाद मैदान मुंबई येथे गेल्या १०० दिवसा पासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांसमोर आंदोलनाच्या १०३ व्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी ठिक ११ वाजता लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात येेणार आहेत.

यात राज्यव्यापी आंदोलन प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने प्रा.डॉ. भाऊसाहेब झिरपे, प्रा.बि.डी.मुंडे, डॉ. बाळासाहेब तौर, डॉ. एस.व्ही भालके, डॉ. भरत खेत्री, डॉ. देवेंद्र ठाकरे डॉ. एस के शाहा, प्रा. सचिन बोरसे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. रामदास नाईकनवरे, डॉ स्वप्निल लांडगे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. उमाकांत कदम, डॉ. संतोष जाधव, प्रा. दिपक खिल्लारे, डॉ. बळीराम वराडे, डॉ.आर.पी. खटाने, डॉ.प्रकाश बावस्कर, प्रा. ज्ञानेश्वर खिलारी, प्रा. भिमा शिंदे, प्रा. सुनिल म्हंकाळे, डॉ. रामेश्वर वघचौरे, डॉ.गणेश शिंदे, डॉ. एकनाथ शिंदे, डॉ. रामेश्वर म्हस्के, प्रा. राजेंद्र खंडारे, एस. एन. कुरणे, आर. आर. फावडे, प्रा. शिवाजी घरडे, प्रा. जे.जे.चौरे, प्रा. जावीर एस.एम, हनुमंत कुर्हे, गोरख मंगवडे, योगेश कांबळे, महेंद्र कलाल अखिल शेख आदींनी केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान येथील आंदोलन सुरु राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

आंदोलनाच्या मागण्या पुढील प्रमाणे :

१) उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे सदरील महाविद्यालयाचा तयार असलेला अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागास तात्काळ सादर करावा.

२) वित्त विभागाच्या मंजुरीसह दि. २४ किंवा २५ मे दरम्याणच्या आगामी कॅबिनेट बैठकीसमोर ठेवुन गेली २२ वर्षे उपेक्षित असलेल्या प्राध्यापक – कर्मचारी व आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्याना न्याय देण्यासाठी सदरील महाविद्यालयांना १००% अनुदान देवून न्याय मिळवून द्यावा.

हे ही वाचा :

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय