Saturday, May 18, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून झालेल्या बैलगाडा शर्यतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टातील यासंदर्भातील सुनावणी डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली होती. तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.

अखेर आज यासंदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्या जोमाने भिर्र बारीचा थरार रंगणार आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्व बाजूंची मते न्यायालयाने ऐकुन घेतल्या. त्यानंतर बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली. 16 डिसेंबर 2021 ला न्यायमूर्ती खानविलकर, न्यायमूर्ती रविकुमार, न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी अटी आणि शर्तीसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने 400 वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय