Friday, May 3, 2024
Homeग्रामीणअंजनावळे येथे शहीद बिरसा मुंडा व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांंची संयुक्त जयंती...

अंजनावळे येथे शहीद बिरसा मुंडा व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांंची संयुक्त जयंती साजरी

 

जुन्नर (पुणे) : आदिवासी समाज व बिरसा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यामानाने दि. 29 नोव्हेंबर रोजी अंजनावळे येथे भगवान बिरसा मुंडा व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 

फडकी झेंडे व क्रांतिकारकांच्या प्रतिमा घेऊन घाटघर ते अंजनावळे बाईक रॅली काढण्यात आली. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राणी दुर्गावती, नांग्या कातकरी, राया ठाकर, सतू मराडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

विद्यार्थिनींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. 

आदिवासी समाजाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित व्हावेत लागेल. आदिवासी देशाचे मूळमालक असताना आजही गरिबी दारिद्रयने का गाजला आहे ? असा प्रश्न उपस्थित सवाल प्रमुख पाहुणे जयसिंग डुडवे यांनी उपस्थित केला.

कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेड सह्याद्री चे अध्यक्ष  काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष डॉ.विनोद केदारी, पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आढारी, उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य काळू गागरे, शिवाजी मडके, सरपंच वसंत लांडे, उषाताई सुपे, रोहिदास म्हसकर, केशव दिघे, मधुकर रेंगडे, बाळासाहेब धराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश साबळे, रोहिदास वाजे यांनी केले तर सोमनाथ उतळे यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय