Friday, May 17, 2024
Homeराज्यकोरोना कॉलर ट्यून बंद करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

कोरोना कॉलर ट्यून बंद करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

पिंपरी चिंचवड : कोरोना कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडूलकर च्या वतीने करण्यात आली आहे. 

कडूलकर यांनी म्हटले आहे, मार्च महिन्यापासून केंद्र सरकारने मोबाईल कॉल वर कोरोना जागृतीसाठी कॉलर ट्यून सुरु करण्याचे आदेश मोबाईल कंपन्यांना दिले. तेव्हापासून मनस्ताप देणारी ही कॉलर ट्यून चेष्टेचा विषय झाली आहे. सलग एक मिनिटं चालणाऱ्या या ट्यून मूळे अनेकांचे वेळ वाया जात असल्याचे म्हटले आहे.

सरकारच्या मूर्खपणामूळे देशातील किंंमती मानवी तास वाया जात आहेत. हि ट्यून बंद करण्यासाठी नेमके काय करावे, हे नागरिकांना समजत नाही. केंद्र सरकारच्या आचरणात विवेक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन नसल्यामुळे सरकार चेष्टेचा विषय बनते. लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारला पत्र पाठवून हि ट्यून बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय