Saturday, April 20, 2024
Homeराज्यनाशिक जिल्हात ११ महिन्यात ३३ शेतकऱ्याच्या आत्महत्या

नाशिक जिल्हात ११ महिन्यात ३३ शेतकऱ्याच्या आत्महत्या

 

नाशिक : संपूर्ण भारतभर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे. देशा बरोबरच नाशिक जिल्ह्यातही ११ महिन्यात ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ह्या आत्महत्या बँकेच्या कर्ज दबावाखाली केल्या गेल्या आहेत. तर यातील काही कुटूंबे सरकारच्या मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर त्यापैकी ११ शेतकऱ्याचे कुटूंब हे सरकारच्या मदतीला अपात्र ठरली आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रशासन ने दिली आहे.

२०२० ते २०२१ च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याचे नोंद झाली आहे. शेतात पीक चांगले न आल्यामुळे बँकेचं कर्ज फेडू शकले नाही. म्हणून बँकेच्या दबावाखाली आत्महत्या झाल्याचे दिसून येते. जिल्हात ३३ शेतकऱ्याच्या आत्महत्या नोंद झाली असून त्यापैकी सर्वात जास्त निफाड तालुक्यात ९ आत्महत्या झाल्या आहेत. दिंडोरीत ५, बागलाण ५ आणि इतर ठिकाणी काही आत्महत्या झाल्याचे नोंद झाली आहे. 

     

यामध्ये १२ शेतकरी हे वय वर्षे ४० चे होते. तर ४ शेतकरी हे वय वर्षे २५ च्या आतील आढळून आले. इतर शेतकरी हे वय वर्षे ४० च्या पुढील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे आपले शेतीचे नुकसान झाल्यामुळे बँकेचे कर्ज हे फेडू शकले नाही, म्हणून यांनी आत्महत्या केली. आणि ११ शेतकऱ्यांनी वैयक्तिक कारणाने आत्महत्या केली, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय