Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदेशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य : आमदार महेश लांडगे

देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड भाजपा मध्यवर्ती कार्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

पिंपरी :
भारतीय स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळेच आपण इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालो. अशा शूरवीरांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे स्वातंत्र्य दिनी मोरवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, शहर उपाध्यक्ष नंदू दाभाडे, आर.एस कुमार, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, बिभीषण चौधरी, माणिक फडतरे, सारिका चव्हाण, कविता हिंगे, अमृता नवले, दिनेश यादव, प्रकाश जवळकर, मुक्ता गोसावी, सागर हिंगणे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, वैशाली खाड्ये, हीना मुलाणी, संतोष मोरे, डॉ. हेमंत देवकुळे, आबा कोळेकर, नितीन अमृतकर, प्रदीप बेंद्रे, योगेश सोनावणे, कमलेश भरवाल, डॉ. अभिजित भालशंकर, प्रकाश चौधरी, कैलास सानप, संजय परळीकर, अमेय देशपांडे, आदर्श शेट्टी, धनंजय शाळीग्राम आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले. त्याला देशवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम या अभियानातून होत आहे. पिंपरी चिंचवडमधील तमाम नागरिक या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. देशाच्या रक्षणासाठी आणि संरक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. बलिदान केले अशा महान क्रांतीकारक, शहीदांना आजच्या दिनी आपण स्मरण केले पाहिजे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय