Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आप’ कडून आकुर्डीत ध्वजारोहण व ज्येष्ठांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरांच्या संपर्क कार्यालयामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने ध्वजारोहण करून भारतीय तिरंगा मानवंदना देण्यात आली.

आम आदमी पार्टीच्या आकुर्डी संपर्क कार्यालयात आपचे पिंपरी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल रामचंद्र काळभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक वाल्मीक बेंद्रे, माजी सैनिक दस्तगीर बक्षुद्दीन मुल्ला, किसन काळभोर, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब कुराडे, जनहित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत गुल्हाने आणि विघ्नहर्ता जेष्ठ नागरी संघाचे भगवान बडगुजर, शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष संपत शिंदे, ज्ञानेश्वर ननावरे, प्रकाश परदेशी, मोहन जाधव, चंद्रमणी जावळे, गंगाधर चौधरी, वसंत सोनार, एकनाथ पाठक, नारायण भोसले, रमेश तराळ, रमेश बनसोड, बबन सुतार, अनिल पाटील आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

त्याचप्रमाणे साईनगर, मामुर्डी, येथील आप जनसंपर्क कार्यालयात साईनगर येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रम सोहळ्याला आपचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख संतोषी नायर, दिलीप सुर्यवंशी, वसंत नांगरे, वेंकटेश कोळी, लक्ष्मीकांत कटारे, प्रकाश हगवणे, स्वप्निल जेवळे, एकात्मिक बाल विकास सेवा अंगणवाडी साईनगर मधील लहान विद्यार्थी व गायकवाड मॅडम आणि साईनगर मधील रहिवासी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख गोविंद माळी यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

---Advertisement---

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles