Sunday, May 19, 2024
Homeकृषीदरा चिंचोरा येथे शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

दरा चिंचोरा येथे शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील दरा चिंचोरा गावात किसान समन्वय संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभेने देशव्यापी प्रतिरोध आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच भाग म्हणून दरा चिंचोरा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोध धोरणांचा धिक्कार असो, शेतकरी विधेयक त्वरित मागे घ्या, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

या आंदोलनात मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. नथू साळवे, कॉ. उत्तम पवार, कॉ.सतीश पवार यांच्यासह विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय