Friday, April 26, 2024
Homeजिल्हासमाजवादी समाजरचनेकडे भारताची वाटचाल गरजेची - प्रसाद कुलकर्णी

समाजवादी समाजरचनेकडे भारताची वाटचाल गरजेची – प्रसाद कुलकर्णी

इचलकरंजी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ज्यांनी स्वराज्याला आपला जन्मसिद्ध हक्क मानले आणि ती प्रेरणा सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवली त्या लोकमान्य टिळकांचा साम्राज्यवादी सत्तांकडून स्वातंत्र्य मिळविण्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. तसेच लढून मिळविलेल्या स्वातंत्र्याद्वारे देशातील वंचित, कष्टकरी, शेतकरी, सर्वहारा वर्गाच्या उन्नती व्हावी आणि समाजवादी समाजरचनेकडे भारताची वाटचाल व्हावी अशी सातत्यपूर्ण आग्रही मांडणी करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकमान्य व लोकशाहीर यांच्या विचारातील व्यापकतेचा लसावी काढून आपल्याला पुढे जावे लागेल, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा १०२ वा जन्मदिन लोकमान्य टिळक यांचा १०२ वा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांच्या प्रतिमाना बाबासाहेब कांबळे व राहुल माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांचा ज्ञानेश्वर माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शशांक बावचकर, प्रा.रमेश लवटे, पांडुरंग पिसे, अशोक माने, विष्णु शिंदे, विशाल जाधव, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हलभावी, सौरभ सुतार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय