Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन (अमृत महोत्सव) मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ऍड.संदीप कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्था अधीक्षक सीताराम अभंग, संशोधन अधिकारी देशपांडे, उपप्राचार्य शिंदे, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. योगेश पवार, क्रीडा शिक्षक प्रा.अनिल दाहोत्रे, एन एस एस प्रमुख भरत राठोड, सांस्कृतिक प्रमुख डॉ.निता कांबळे उपस्थिती होते.

यावेळी प्राचार्य डॉ.झावरे यांनी उपस्थितांना ध्वज शपथ देत, अमृत महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण विचारत घेतले पाहिजे. महाविद्यालयात सुरू झालेल्या नवीन व्यावसायिक शिक्षणाचा फायदा घेत स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर झाले पाहिजेत. महाविद्यालयात आयोजित विविध उपक्रमांची माहिती देवून प्रास्ताविक सादर केले.

यावेळी प्राचार्य डॉ. झावरे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारताने मागील 75 वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये खूप प्रगती केली आहे. ही प्रगती करताना यामध्ये खूप जणांचे योगदान आहे. भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान केले, त्या सर्वांचे स्मरण करणे व त्यांचे बलिदान लक्षात ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी व युवा पिढी हे भारताचे भविष्य आहे व त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये अजून प्रगती करावी असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले. अमृत महोत्सव निमित्ताने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शांती चे प्रतीक म्हणून हवेत तिरंगा रंगाचे फुगे सोडण्यात आले. महाविद्यालयाचा परिसरात सुशोभीकरण करण्यात आला होता. या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश पवार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी, समिती समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय