Thursday, May 9, 2024
Homeजुन्नरचिंचवड येथे गणपती मूर्तिकला कार्यशाळा

चिंचवड येथे गणपती मूर्तिकला कार्यशाळा

पिंपरी चिंचवड : चिंचवड परिसरातील लहान-मोठ्यांना स्वतःच्या हातांनी गणपती मूर्ती बनवून त्याचा आनंद घेता यावा व पर्यावरण पूरक शाडू मातीचा वापर करून मूर्ती बनवून त्या मूर्तींची प्रतिस्थापना करावी असे सामाजिक हेतू ठेऊन प्रभाग १८ चिंचवड मध्ये मधुकर बच्चे युवा मंच व ‘क’ कॅलिग्राफी तसेच शशिकला फौंडेशन या संस्थेच्या वतीने वतीने रविवार दि.२१/८/२०२२ रोजी
कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक हॉल चिंचवड येथे ‘आपली माती!! आपला गणपती’ ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

प्रभागातील जास्तीत जास्त लहान मोठ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घ्यावा असे आवाहन सदस्य महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे व मधुकर बच्चे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नावनोंदणी संपर्क : ७७५५९२०५४४

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय