मुंबई : महागाईपासून होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक वृत्त आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. म्हणूनच येत्या काळात पेट्रोलचे दर तब्बल १० ते १२ रुपयांनी घसरण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत सध्या मिळत आहेत. तसे झाले तर ऐन सणासुदीत ग्राहकांना मोठ्ठा दिलासा मिळणार आहे.
जागतिक बाजारपेठेतील कच्चे तेल म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की, महागाईचा भडका उडतो आणि सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतो, साहजिकच पेट्रोल डिझेलच्या किमतीकडे सर्वांचेच लक्ष असते, परंतु येत्या दसरा दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, किंबहुना त्यांचा हा सण काहीसा आनंदातच जाणार आहे, असे दिसून येते. कारण येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये चांगली म्हणजे किमान दहा ते पंधरा रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मात्र तरी देखील देशांतर्गत बाजारात साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर राहिले. क्रूडमध्ये अजूनही सातत्याने घसरण सुरू असून सणासुदीच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा बाजारपेठ आणि व्यापार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १२ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या आसपास असूनही, काल रविवारी म्हणजेच दि. १९ सप्टेंबर रोजी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सारख्याच होत्या. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे आठवडाभरापासून कमीच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर किमान ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असे सांगण्यात येते.
आनंदाची बातमी, पेट्रोल 10 ते 12 रुपयाने होणार स्वस्त !
संबंधित लेख