Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. माकपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. (CPIM J P Gavit)
माजी आमदार जे. पी. गावित आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माजी आमदार जे. पी. गावित (CPIM J P Gavit) यांनी केली होती. मात्र, ही जागा शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यानंतर गावित यांनी एल्गार पुकारला. दिंडोरीत गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची जाहीर सभा घेत ही जागा माकपला सोडण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना बदला. नाही तर तुमचा उमेदवार पडणारच, असा इशारा त्यांनी शरद पवारांना दिला होता. महाविकास आघाडीने जागा न दिल्यास माकपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय झाला होता.
यात शरद पवार गटाने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावेळी तातडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांची भेट घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे देखील आश्वासन दिले.
मात्र, गावित यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावत, उमेदवारीचा आग्रह कायम ठेवला. महाविकास आघाडीकडून प्रतिसादाची प्रतिक्षा असताना माकपच्या वरिष्ठ पातळीवरून चिन्हावर निवडणुक लढण्याचे आदेश मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे माकप आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन
शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ