Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भर पावसातही गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद

PCMC : भर पावसातही गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी चिंचवड मनपा, डॉ.डी.वाय पाटील फार्मसी महाविद्यालय-पिंपरी, आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात येत आहे.

भर पावसात गणेशोत्सव विसर्जनाच्या पाचव्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद सकाळी ८ पासुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत १२०० हुन अधिक मुर्तीचे दान मिळाले आणि जवळजवळ ४ टन निर्माल्यदान मिळाले.

ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपुर्ण दहा दिवस होणार आहे. संस्थेनी शिफ्ट प्रमाणे सभासदांची निवड करुन सेवा करण्याची संधी दिली आहे.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद पाथरे, भरत शिंदे, शब्बीर मुजावर, मनोहर कड, प्रभाकर मेरुकर, सुशिलकुमार गायकवाड, नसिम शेख, संजित पद्मन, सोमनाथ पतंगे, रामदास सैंदाने, यश ढवळे, गोविंद चितोडकर आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय