Wednesday, May 8, 2024
Homeविशेष लेखमुंबईच्या बेस्ट बस व्यवस्थेत लढा समान कामाला समान वेतनाचा – लता परब

मुंबईच्या बेस्ट बस व्यवस्थेत लढा समान कामाला समान वेतनाचा – लता परब

बेस्टला स्वतःचा असा इतिहास आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) ही मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. मुंबईत बेस्ट प्रशासनाची ती इमारत बांधकाम जरी पाहिलं तरी लक्षात येते की ही कल्याणकारी योजनांचा लाभ पुढील अनेक वर्षे जनतेला मिळावा यासाठी कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी मोठे श्रम घेण्यात आले होते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बेस्ट बस मुंबईच्या मानाचा तुरा होती. भारतातील इतर राज्यात बससेवा सुरू करण्यासाठी आपल्या ‘बेस्ट’ बससेवेचा अभ्यास केला जातो. मुंबई पावसाच्या पाण्यामुळे तुंबली असता बेस्ट बस ने नेटाने सेवा दिलेली कोणीही मुंबईकर विसरू शकत नाही. मुंबईतील कामकाजी महिलावर्ग बिनदिक्कत रात्रीचा व पहाटेचा प्रवास करू शकतात. अश्या महत्त्वपूर्ण गरजेच्या सार्वजनिक वाहतुकीच्या खाजगीकरणाच्या डावात हे महाराष्ट्र सरकार आणि खुद्द बेस्ट प्रशासन सामील आहे. सार्वजनिक वाहतुक सेवा ‘ बेस्ट’ संपवण्याचा सरकारचा मानस आहे. त्याची सुरुवात त्यांनी बेस्टचा स्वतःचा ताफा कमी करून खाजगी कंत्राटदारांना बसेस चालवण्याची परवानगी देवून केली आली आहे. हे कंत्राटदार स्वतःचा फायदा होण्यासाठी कामगारांची पिळवणूक करून नफा कमवत आहेत. Fight for Equal Pay for Equal Work in Mumbai’s Best Bus System – Lata Parab

मुंबईत कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात राहतो व बेस्टच्या बसेने प्रवास करणारे प्रवासी सर्वसामान्य गरजू लोकं असतात. कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी या स्वस्तव परवडणार्‍या सार्वजनिक वाहतुकीची त्यांना मौलाची मदत होते. मुंबईतील जनतेच्या रोजच्या जीवनाचा बेस्ट बस हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या गरजेचा भाग आहे. बेस्ट बस प्रशासन त्याच गोष्टीचा फायदा घेऊन जनतेला वेठीस धरून ही सार्वजनिक वाहतुक सेवा खाजगी करण्याच्या प्रयत्नात आहे.

बेस्ट बस खाजगी वाहतूक करुन सामान्य जनतेकडून वसूल केलेला पैसा त्यांना नफा म्हणून कमवता येणार आहे. नफा कमविण्यासाठी त्यांनी हलक्या प्रतीच्या बसेस उपलब्ध करून कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालू केला आहे. कामगारांच्या प्रशिक्षणावरचा खर्च कमी करून प्रवाशांचा व खुद्द त्या कामगारांचा जीव धोक्यात घातला आहे. कमी पगारात हे मजबूर कामगार काम करत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांचा मानसिक छळ होताना दिसतो. कायद्याच्या कामगार संकल्पनेनुसार हा वेट लीज कामगार, कामगार म्हणून कामगार कायद्यात बसत नाही. त्यामुळे सगळे कामगार कायदे धाब्यावर बसवून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करतात. परिणामी हे कंत्राटी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. तुटपुंज्या पगारामुळे हताश व कर्जबाजारी होऊन त्यापैकी काहींनी आत्महत्या केली.

एका महत्त्वपूर्ण निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की या कल्याणकारी राज्यात समान कामाला समान वेतन नाकारणे हे शोषणात्मक, जुलमी आणि जाचक असेल. या महत्वपूर्ण निरीक्षणाच्या सहाय्याने ‘संघर्ष कर्मचारी कामगार युनियन’ मागील दोन- तीन वर्षापासून या कामगारांच्या वर होणाऱ्या अन्याय विरुध्द आवाज उठवत सतत त्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबाजावणीसाठी संघर्ष कर्मचारी कामगार युनियनने मुंबईतील बेस्ट बसेसचे वेट लीज कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि मुख्य मागणी समान कामाला समान वेतन याकरीता आंदोलन सुरू केले. वेट लीजचे सुमारे 9000 कामगार या आंदोलनामध्ये सामील झाले. 

31 जुलै रोजी वेट लिज कामगार रघुनाथ खजुरकर यांच्या कुटुंबाने व्यक्तिकरीत्या उपोषण सुरू करून आंदोलनाला सुरूवात केली. दि. उपोषणाला वाढता पाठिंबा आणि सहभाग पाहून सरकारकडून 2 ऑगस्ट रोजी उपोषण करत्यांनी  राज्याचे मुख्यमंत्री भेट देणार असे सांगितले गेले. इथे आंदोलनाला वेगळेच वळण दिले जात होते. मुखमंत्र्याबरोवर कोणतीही चर्चा होत नसताना, चर्चा होतेय असे भासवल जात होते, कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. उपोषण करत असल्याबद्दल सहानभुती घेत असलेली महिला मुख्यमंत्री काय म्हणातायेत याची माहिती देत नव्हती. ती माहिती लपवत आहे याची माहिती आंदोलनात सहभागी असलेले कामगार देत होते.

दि. 3 ऑगस्ट रोजी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या कार्यकारीणीच्या बैठकीत निर्णय घेतला गेला की उपोषणाला पाठिंबा दर्शवून, पूर्ण बंद करून आपण आपल्या युनियनच्या बॅनर अंतर्गत आंदोलन करावे व आपले मागणी पत्र व निवेदन वडाळा बेस्ट डेपो येथे द्यावे. कामगारांना तसे आवाहन करण्यात आले आणि पुढच्याच दिवशी वेट-लीज बसवर काम करणारे सर्व कामगारांनी मागाठाणे, गोराई, मालवणी , दिंडोशी,मरोळ, ओशिवरा, सांताक्रूझ, धारावी, वरळी, मुंबई सेंट्रल, बॅकबे, प्रतीक्षा नगर, कुलाबा आणिक,देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड डेपो मधील वेट-लिज कर्मचारी मोर्चा वडाळा बेस्ट डेपो येथे  यशस्वी करून, बेस्टच्या मुळ मालक, बेस्ट उपक्रम यांना मागणी पत्राचे निवेदन देण्यात आले. व त्याची प्रत मुख्यमंत्री, डागा, हंसा, मातेश्वरी व कामगार आयुक्त यांना देण्यात आली. आझाद मैदान येथे युनियन चे झेंडे बॅनर्स घेऊन मोर्चाने उपोषण आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा दिला. 

दि. ५ ऑगस्ट रोजी आझाद मैदान, पत्रकार भवनाच्या आवारात, सीआयटीयू कार्यालया जवळील हाॅल  मध्ये ७०० ते ८०० कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात, बेस्ट कामगार संघटनेचे कॉ उदय भट, संघर्ष युनियनचे रंगनाथ सातवसे, हरिष गायकवाड, बशीर अहमद, लता परब, ज. म. कहार व मनोज यादव,  यांनी मार्गदर्शन केले. सर्व वेट-लिज कर्मचारी या आंदोलनात  सहभागी होऊन बंद पुकारला दि.06.08.2023 रोजी डेपो भेट करण्याचे ठरवले. दि. ६ ऑगस्ट रोजी ठरल्या प्रमाणे युनियन ने सर्व वेट-लिज डेपो भेट घेऊन ७ ऑगस्ट बेस्ट वर्धापनदिनी कोतवाल गार्डन ते वडाळा डेपोवर मोर्चा “आमची मुंबई आमची बेस्ट”, या नागरिक मंचा सह करण्याचे महत्त्व पटवून दिले.  दि. ७ ऑगस्ट रोजी, मोर्चात शासनाने नकार दिले, पोलिसानी कोतवाल गार्डनला कुलूप लावले, म्हणून सदर मोर्चा दादर टी.टी. येथे जमुन वडाळा डेपो वर जाण्याचे ठरविले परंतु पोलिसांनी पुन्हा अडविले म्हणून चार चार माणस हळूहळू वडाला डेपो समोर जमले. 

या कार्यक्रमात ट्रेड युनियन्स, जनसंघटना, बेस्ट निवृत्त कामगार, युवक व विद्यार्थी, महिला संघटना तसेच माकप, सीपीआय, शेकाप, समाजवादी पक्ष, लाल निशाण पक्ष, काँग्रेस पक्ष व वेट-लिज चे ८०० कर्मचारी सामील झाले होते. आमची मुंबई आमची बेस्ट मंचाचे निमंत्रक श्री. विद्याधर दाते, श्रीमती संध्या गोखले, श्रीम. उज्ज्वला म्हात्रे या शिष्टमंडळ ने वेट-लिज कर्मचारी, उपक्रमाचा विकास, या वर चर्चा करून  सर्व कर्मचारी, प्रवासी, नागरीक, यांच्या वतीने निवेदन सादर केले. सदर कार्यक्रमात सीआयटीयू चे अध्यक्ष कॉम्रेड वर्तक, जनवादी महिला संघटनेच्या कॉम्रेड सुगंधी फ्रांन्सिस, कॉम्रेड अंजू दिवेकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी (सीपीआय), कॉम्रेड सदानंद यादव (निवृत्त बेस्ट कामगार संघटना), अरविंद कांगिंकर (BWU) श्री.नितीन पाटील (BEU), कॉम्रेड जगनारायन  (संघर्ष का.क.युनियन),  विद्याधर दाते,  उज्ज्वला म्हात्रे यांनी उपस्थितांना संबोधित केले.   

दि. ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांनी उपोषणकर्त्या प्रज्ञा खजूरकर यांच्या सर्वसामान्य मागण्या शाब्दिकरीत्या (तोंडी) मान्य करून आठ दिवस चालणारे  संपसदृष्य आंदोलन मागे घेण्यास सांगितले व उपोषणकर्त्या प्रज्ञा खजूरकर यांनी त्यांचे उपोषण ताबडतोबीने मागे घेतले. दरम्यान ईलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया ने पूर्ण संपच मागे घेतल्याची गेल्याची माहिती देवून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण केला.  संभ्रमित कामगारांनी जवळपास 500 आंदोलनकर्त्या कामगारांनी युनियनशी संपर्क करुन सीटू कामगार संघटनेच्या कार्यालयात जमा होऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. जोपर्यंत मुख्यमंत्री लिखितस्वरूपात मागण्या मान्य करीत नाहीत, तो पर्यंत माघार घ्यायची नाही असे कामगारांनी ठरविले. 

मुख्यमंत्री यांचे तोंडी आश्वासन व मिडियाने केलेल्या प्रचारामुळे आणि प्रज्ञा खजूरकर यांनी संप मागे घेण्याचे केलेले आवाहन यामुळे जवळपास ८५ टक्के बसेस दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट ला सुरळीत सुरू झाल्या. या आंदोलनात १२६ कामगारांना खाजगी कंपन्यानी कोर्ट नोटीस बजावली, बॅक बे डेपो तील दोन कर्मचारी अटक केली व वेगवेगळ्या डेपो तील युनियनच्या कामगारांना अटक करण्यात आली.  युनियनच्या वतीने तत्काळ मदत करून कामगारांना,  ॲड.चंद्रकांत भोजगर,  ॲड.राजू कोरडे यांच्या मदतीने सुरक्षित केले.  बॅकबे डेपो तील दोन कर्मचाऱ्यांकरीता ॲड. किशोर सामंत यांनी तत्काळ भेट घेऊन, ताबडतोब कोर्ट प्रक्रिया पूर्ण करुन दोन्ही कर्मचाऱ्यांची सुटका केली. 

युनियनने तत्काळ कार्यकारिणीची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हावे असे निर्णय घेतले. ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस, कोर्ट नोटीस पाठवली त्यांच्या करीता औद्योगिक न्यायालयात  तिन कंपन्यांनी विविध कायद्याखाली सुमारे ५६ कामगारांच्या विरोधात तक्रार दाखल केली, याच्या सुनावणीत  11 ऑगस्ट 2023 रोजी औद्योगिक न्यायालय कामगारांच्यावतीने संघर्ष कामगार कर्मचारी युनियन उभी राहिली व कोर्टात पुराव्यासह दाखवून दिले की व्यवस्थापन या कामगारांना कामावर घेत नाही आहे व इतर कामगारांना कामावर घेऊन पक्षपात व भेदभाव करीत आहे. या बाबी व्यवस्थापनाच्या वकिलाला लक्षात आल्यानंतर पुढच्याच दिवशी 12 ऑगस्टला रोजी अंडरटेकींग घेऊन युनियनच्या १२३ सभासदांना कामावर रुजू करून घेतले. संघर्ष कर्मचारी कामगार युनियनचे शशांक राव कामानिमित्त बाहेर असल्याने प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत. या आंदोलनात कॉम्रेड हरिष गायकवाड, लता परब, बशीर अहमद, रंगनाथ सातवसे व जगनारायण कहार यांनी पाठपुरावा आणि महत्वाची भूमिका पार पाडली. सार्वजनिक बस ही वाहतूक सेवेच्या खाजगीकरण-कंत्राटीकरणविरुद्ध आणि समान कामासाठी समान वेटणाचा कामगारांचा लढा चालू आहे.

– लता परब (9768772660)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय