Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणघोडेगावमध्ये रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर संपन्न

घोडेगावमध्ये रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर संपन्न

घोडेगाव : जनता विद्यामंदीर ज्यु. कॉलेज घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे वृद्धी फाऊंडेशन घोडेगाव व आयडीयल इंटरनॅशनल इन्स्टिटयुट ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग विभागाचे सहाय्यक अमर राऊत, उद्योग केंद्राचे जिल्हा निरीक्षक चंद्रभान गोहाड, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक राकेश कुमार, सेवा योजन अधिकारी संकेत लोहार, चॉर्टड अकाऊंट संतोष फुलारे, उद्योजक धनंजय शिंदे, संस्थेचे अध्यक्ष गोविंद पानसरे उपस्थित होते.

यावेळी सेवा उद्योग, उत्पादन उद्योग कृषी आधारित उद्योग, शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, बीज भांडवल योजना या योजनेद्वारे कर्ज प्रकरण कसे करायचे, बँक कर्ज प्रकरणात त्यावर कशी अंमलबजावणी केली जाते याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीरात सुमारे ७५ ते ८० लोकांनी सहभाग घेतला होता.

आलेल्या सर्व मान्यवरांचे नारळ व चिकुची झाडे देऊन आभार व्यक्त करण्यात आले. त्यातून वृक्ष लागवडीचा संदेश संस्थे मार्फत देण्यात आला. कार्यक्रम संयोजनासाठी वृद्धी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रणय दरंदळे, प्रकल्प संचालक रवींद्र रनसिंग, धनेश फलके, वैभव भेके ,नितेश काळे यांनी विशेष श्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे प्रकल्प संचालक रविंद्र रणसिंग यांनी केले व आभार प्रदर्शन रमाकांत पोतदार यांनी केले. तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय