पर्थ : ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरामधील रेस्टॉरंटमध्ये सध्या कर्मचार्यांची प्रचंड टंचाई जाणवू लागली आहे. यामुळेच ही रेस्टॉरंट आपल्या क्षमतेनुसार ग्राहकांना सेवा देण्यास अपयशी ठरत आहेत.
याच शहरात असलेल्या एका ‘इटालियन फाईन-डाईनिंग रेस्टॉरंट’ने तर कर्मचार्यांसाठी भन्नाट ऑफर देऊ केल्या आहेत. कर्मचार्यांना ताशी 55 डॉलर्स (सुमारे चार हजार रुपये) देण्याची तयारी या रेस्टॉरंटने केली आहे. ही मजुरी पूर्वीपेक्षा तीन पटीने जास्त आहे.
कोरोनाचे संकट वाढत असल्याने पर्थच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दुसर्या शहरातून कामासाठी येणारे मजूर कोव्हिड-19 नियमांमुळे आपापल्या घरी गेले अथवा ते येऊ शकत नाही. अशा स्थितीत मोठा पगार देण्याच्या ऑफरची घोषणा केली तरी या रेस्टॉरंटना वेटर मिळेनासे झाले आहेत.
कोरोना काळात पर्थमधील अनेक रेस्टॉरंटनी पूर्वीपेक्षाही जास्त वेतन आपल्या कर्मचार्यांना देण्यास सुरुवात केली आहे. तरीही त्यांना आता वेटरची टंचाई भेडसावत आहे. वेस्ट पर्थ रेस्टॉरंटच्या ऑनलाईन जाहिरातीत आपल्याला अनुभवी आणि चांगल्या पद्धतीने ग्राहकांना सेवा देऊ शकणार्या वेटरची आवश्यकता आहे. यासाठी ताशी 55 हजार डॉलर्स देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. वेटर टंचाईचे असे चित्र ऑस्ट्रेलियातील बहुतेक रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे.