Thursday, February 20, 2025

डीवायएफआयचे मानवत तालुका व कोल्हा गांव अधिवेशन संपन्न

मानवत : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेचे मानवत तालुका व तालुक्यातील कोल्हा गांवचे प्रत्येकी पहिले अधिवेशन संपन्न झाले. 

डीवायएफआय ही देशातील तरुणांचे शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्न तसेच विविध विषयांना घेऊन काम करणारी आणि लोकशाही मूल्यांना घेऊन चालणारी धर्मनिरपेक्ष संघटना आहे. विविध शैक्षणिक समस्या व वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन शासकीय धोरणांवर एक दबाब गट म्हणून संघटित शक्ती उभी रहावी या निमित्ताने संघटनेकडून ही बांधणी करण्यात येत असल्याचे डीवायएफआयचे जिल्हा सचिव नसिर शेख यांनी सांगितले.

या अधिवेशनात मानवत तालुका अध्यक्ष म्हणून मुकुंद गोंडगे व तालुका सचिव म्हणून नितीन चौधरी यांची निवड करण्यात आली, तसेच कोल्हा गांव अध्यक्ष म्हणून कृष्णा कळसाईतकर तर सचिव म्हणून दिनेश थिट्टे यांची निवड करण्यात आली.

या अधिवेशनाला सिटू या कामगार संघटनेचे कॉ. रामराजे महाडिक, अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. दिपक लिपने, डीवायएफआयचे जिल्हासचिव कॉ. नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. सुनील तारे, सहसचिव मुकुंद गोंडगे, जिल्हा कमिटी सदस्य अनिल मुळे, पूर्णा तालुका सचिव अमन जोंधळे आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles