नाणेघाट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्ता मेळावा संपन्न
जुन्नर : बाजाराच्या अर्थव्यवस्थेमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही, अशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात ही विश्वासार्हता शिल्लक आहे असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी केले. नाणेघाट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना अभ्यंकर म्हणाले, लोकशाही प्रणाली मानणारे आणि अंमलबजावणी करणारे कम्युनिस्ट पक्षच आहेत. आजची व्यवस्था नोकरशाहीच्या हातात आहे. त्यांना सरळ करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तसेच अस्मिता या तोडणाऱ्या नव्हते, तर जोडणाऱ्या असल्या पाहिजे. तर आपण समाजव्यवस्था बदलू शकतो. कारण आमचे हौतात्म्य हा आमचा विजय आहे, असेही अभ्यंकर म्हणाले.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव एँड. नाथा शिंगाडे, डॉ. महारूद्र डाके, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, तालुका सचिव गणपत घोडे, लक्ष्मण जोशी, डॉ. मंगेश मांडवे आदीसह उपस्थित होते.