न्यूयॉर्क : चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत १०० जणांना जीव गमवावा लागला आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा केंटकी भागाला बसला आहे. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. ताशी ३२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अमेरिकेतील ६ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मेफिल्डचे मुख्य अग्निशमन केंद्र आणि आपत्कालीन सेवा केंद्राला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बचावाचे प्रयत्न गुंतागुंतीचे झाले आहेत. शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. सीएनएनने चक्रीवादळानंतरचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये विध्वंस स्पष्टपणे दिसत आहे.
अमेरिकेच्या केंटकी राज्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेफिल्डसह अनेक भागात चक्रीवादळामुळे सुमारे १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, मेफिल्ड परिसरातील मेणबत्ती कारखान्याला वादळामुळे मोठा फटका बसला आहे. मेणबत्ती कारखान्याला वादळाचा तडाखा बसला तेव्हा शेकडो कामगार कारखान्यात काम करत होते.