जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ग्रामीण आदिवासी विद्यार्थी व पालकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांना अधिकचे पैसे,अधिकचा वेळ आणि खूप त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे माणकेश्वर गावातील महिला आणि ग्रामस्थांनी गावातच जात प्रमाणपत्र नोंदणी अभियान राबवून एक आदर्श उपक्रम निर्माण केला आहे. रविवार दि.12 डिसेंबर 2021 रोजी सुमारे 33 अर्जदारांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जाची नोंदणी केली आहे.
आपले सरकार सेवा केंद्र ,चिंचेचीवाडी देवळेचे संचालक निवृत्ती बोऱ्हाडे यांचे मार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
अशा प्रकारच्या शासकीय योजना व उपक्रम गाव पातळीवर राबविले तर नक्कीच विद्यार्थी व पालकांना खूप मदत होणार आहे.त्यामुळे विध्यार्थ्यांना शिक्षण,नोकरी आणि पालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या जात प्रमाणपतत्राचा फायदा होणार आहे.सदर उपक्रमाचे आदिवासी भागातून तसेच तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
या वेळी उपसरपंच माधुरी कोरडे, पोलीस पाटील रोहिदास कोरडे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, कुकडेश्वर वन धन केंद्राचे सदस्य एकनाथ मुंढे, पेसा सदस्या शेवंताबाई बांबळे तसेच ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.