Monday, February 17, 2025

जुन्नर : लेण्याद्री येथे भाविकांसाठी अन्नछत्र सुरू

जुन्नर / आनंद कांबळे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान येथे भाविकांसाठी अल्पदरात महाप्रसादाची सुरुवात आज ह.भ.प आत्माराम महाराज बटवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

गेली दोन वर्ष कोरोना महामारी आणि लॉकडाऊन असल्यामुळे देवस्थानचे अन्नछात्र बंद होते. परंतु आता पुन्हा शासनाने मंदिरे आणि धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केल्यामुळे पुन्हा एकदा आज श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने भाविकांसाठी अल्पदरात पोटभर जेवण हा उपक्रम सुरू केला आहे. सकाळी ११:०० ते दुपारी २:०० व संध्याकाळी ७:०० ते १०:०० या वेळेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी केले. याबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी ह.भ.प. आत्माराम महाराज बटवाल, सयाजी भगत, देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, जयवंत डोके, भगवान हांडे, रोहिदास बिडवई, तसेच भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles