नवी दिल्ली, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज ट्वीटर अकाउंट हॅक झाले होते, तसेच यावरून बिटकॉइन संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंट वरील संदेशात म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत ही मोठी घोषणा करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. यावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र काही वेळातच त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. या घटनेनंतर ट्विटर कडून त्यांचे अकाउंट पुन्हा पूर्ववत करण्यात आले.
पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करून ‘भारतानं रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार 500 BTC खरेदी करुन लोकांना वाटत आहे’ असं हॅकर्सनी ट्विट केलं होतं.
दरम्यान, क्रिप्टो करन्सीला मान्यता देण्यास सरकारने नकार दिलेला आहे. नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करून खोडसाळपणा करण्यात आला होता.