Sunday, May 19, 2024
Homeराज्यसंभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रीकृष्ण कुलकर्णीचे वंशज – यशोमती ठाकूर

संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रीकृष्ण कुलकर्णीचे वंशज – यशोमती ठाकूर

अमरावती : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या नंतर संपूर्ण राज्यात वादंग सुरू आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आता काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भिडें विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

संभाजी भिडे यांच्याविषयी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हा माणूस इतका घाणेरडा आहे. भिडे ज्या भागातून येतात, तिथे फोन लावला आणि हा माणूस कसा आहे असं विचारलं. तेव्हा संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वंशज आहेत. असं स्थानिक लोक सांगतात. दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे, बद्दल मोठा दावा केला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा आरोप त्यांनी अमरावती येथे केला.

महात्मा गांधी आणि तिरंग्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला रविवार पर्यंत अटक करावी, अशी मागणी अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी केली आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी राज्य शासनाला दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय