बारामती : पवार कुटूंबायची १९६७ पासून आतापर्यंत कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील कन्हेरी इथल्या मारुती मंदिरातून होतो. काल सुप्रिया सुळेच्या प्रचाराचा नारळ याच कन्हेरीच्या मंदिरातून फुटला आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरी मंदिरातून सकाळी अजित पवाराच्या उपस्थितीत फोडला आहे. त्यानंतर आज बारामती लोकसभा मतदार संघाची सून म्हणून एकच सांगते. आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करुन बारामतीची सून म्हणून मला विजयी करावं. कन्हेरीचा मारुती कायम माझ्या पाठीशी राहिलाय आणि पुढेही राहणार, असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला. Sunetra pawar
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असताना अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या माझ्यावर विश्वास आहेच मात्र जास्त विश्वास तुमच्यावर आहे. तुमच्या सगळ्यांच्या वहिनींना काम करताना जबबादारीची जाणीव आहे. सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन असा विश्वास त्यांनी बारामतीकरांनी दिला. तुम्ही सगळेच अजित पवारांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात मात्र त्यांच्यामुळे मलाही पाठिंबा देणार यांची खात्री आहे. आपले सहकारी विजय शिवतारे आणि बाकी सहकाऱ्यांच्या सोबत येण्याने वज्रमुठ पक्की झाली आहे. हे सगळे सहकारी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे वज्रमुठ आणखी घट्ट राहणार आहे. विजय हा आपला निश्चित आहे, असं म्हणत त्यांनी विजयाची खात्री दिली.Sunetra pawar
मागील १० वर्षात मी अनेक कामं केलीत. विद्या प्रतिष्ठानामार्फत अनेक विद्यार्थ्यांसाठी काम केलं आहे. गोरगरिबांचीच नाही तर अनेकांसाठी काम केलं आहे. त्यामुळे येत्या काळातदेखील हे कामं करायची संधी मला मिळावी, अशी अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेन, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी कामंं केली ती सगळ्या जगापुढे आहे. देशात मोदी एके मोदी असा नारा आहे. सगळ्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचल्या आहे. त्यांची कार्यक्षमता पाहून देश एका वेगळ्या स्थानावर पोहचलं आहे. देशातील मोदींचं काम पाहून विकास पाहून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे महायुतीच्या बारामतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला विजयी करा, असं आवाहन सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना केलं आहे.Sunetra pawar
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष