Friday, May 17, 2024
Homeग्रामीणमणिपूर हिंसाचार व कुकी आदिवासी महिलांवरील अत्याचाराचा माकप कडून निषेध

मणिपूर हिंसाचार व कुकी आदिवासी महिलांवरील अत्याचाराचा माकप कडून निषेध

घोडेगाव : मणिपूर राज्यातील हिंसाचार व कुकी आदिवासी समुदायांतील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आंबेगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

देशातील मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या या राज्यात मैतेई समुदायाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर त्या राज्यातील मैतेई व कुकी समुदायामध्ये मध्ये संघर्ष उभा राहिला आहे. त्यात घडलेल्या हिंसाचार, जातीय दंगलीत दि. ४ मे २०२३ रोजी मैतेई समुदायाने कांग्पोप्की जिल्ह्यातील बी फायनॉम गावात कुकी समुदायांच्या घरांवर हल्ला करून कुकी आदिवासींच्या दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची गावामधून अक्षरशः नग्न धिंड काढुन त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले. हि घटना मानवतेला काळिमा फासणारी अतिशय निंदनीय घटना आहे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. व अशी मागणी करत आहोत कि संबंधीत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी.

“मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये आरक्षण व धर्माच्या आडून असंतोष पसरविण्याचे काम व त्याद्वारे जातीय आणि धार्मिक दंगली घडवून आणणाऱ्या भाजप शाषित सरकार या राज्यात करत आहेत. या दंगली थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही उलट या हिंसाचारावर मुग गिळून बसले आहेत. आम्ही केंद्र व मणिपूरच्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो. व मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी करत आहोत.” असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंबेगाव तालुका सचिव बाळू म्हणाले.

यावेळी माकपा तालुका समिती सदस्य अविनाश गवारी, अर्जुन काळे, एसएफआय आंबेगाव तालुका समिती सचिव समीर गारे, राहुल कारंडे, अक्षय वालकोळी इत्यादी उपस्थित होते.

हे ही वाचा :

मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड ; चार आरोपींना अटक

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

मणिपूर : प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा, तुम्ही विचलित कसे होत नाही?

मणिपूर लांछनास्पद घटनेचे पडसाद, कष्टकरी महिलांकडून पिंपरी चिंचवड मध्ये संतप्त आंदोलन

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

add 5
add 4
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय