Sunday, May 5, 2024
Homeराज्यब्रेकिंग : 'या' 4 जिल्ह्यांना आज 'रेड ॲलर्ट' ; तर "या" जिल्ह्यांना...

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

मुंबई : राज्यात जोरदार मुसळधार पाऊस बरसतो आहे. मुंबई आणि घाटमाथ्यावर शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, पालघर, ठाणे, रायगडला शुक्रवारी ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील तयार झालेला कमी दाबाचे पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओदिशा किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबारसह विदर्भाला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय