Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदवंडी यात्रा : मातंग समाजच्या आर्थिक अधिकार हक्काची शैक्षणिक व आर्थिक मागण्याची...

दवंडी यात्रा : मातंग समाजच्या आर्थिक अधिकार हक्काची शैक्षणिक व आर्थिक मागण्याची सनद आम्ही सरकारकडे सादर केली आहे – युवराज दाखले

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मातंग समाज अतिशय पुरातन काळापासून असून ती एक राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली जमात होती. या समाजात थोर ऋषि, मुनि, योगी पुरुष, व महान असे विचारवंत होऊंन गेले. मातंग समाज प्रगल्भ विदवत्ता धारक होता. या समाजाने विविध विषयात नावीन्य प्राप्त केले होते. जप, तप, साधना , आराधना, सत्वशील वृत्ति, तसेच शौर्य, ध्येय या विशेष गुणांनी संपन्न होता.



अलिकडच्या काळात मातंग समाजाच्या विविध आर्थिक व सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. समाजामध्ये अधिकार हक्कासाठी शैक्षणिक व आर्थिक मागण्याची सनद आम्ही सरकारकडे सादर केली आहे. मातंग समाजाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दवंडी यात्रेचे माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे,असे युवराज दाखले यांनी सांगितले.

सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने दवंडी यात्रा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजारों समाज बांधवांच्या उपस्थित पार पडली. आमच्या मागण्या मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे. सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी खालील मुद्द्यांवर एकमत झाले.



१) अनुसूचित जाती आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण

२) मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासासाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करणे

३) क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीसाठी सुधारित GR काढणे

४) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा थकीत निधी देऊन महामंडळ पूर्ण क्षमतेने चालू करणे

५) मातंग समाजाच्या आरक्षणासाठी प्राण देणारे शहीद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा.

या प्रसंगी युवराज दाखले यांनी या मागणीला राज्यसरकारने गंभीरपणे न घेतल्यास सकल मातंग समाजाला न्याय न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.



सर्वपक्षीय आमदारांचा आंदोलनास पाठिंबा


२० जुलै २०२३ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर झालेल्या समाजाच्या दवंडी यात्रा आंदोलनात प्रचंड मोठा समाज उपस्थित होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील कांबळे, आमदार नामदेव ससाणे, शिवसेना आमदार सचिन अहिर, आमदार भास्कर जाधव, व समाजातील सर्व प्रमुख संघटनांचे पदाधिकारी उपस्थित शिवशाही व्यापारी संघाची व सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराची भुमिका मांडून पाठिंबा दिला.

यावेळी सकल मातंग समाज समन्वयक ॲड राम चव्हाण, ॲड मारूती वाडेकर, रमेश गालफाडे, गणपत भिसे, युवराज दाखले, विष्णू कसबे, शंकर तडाखे, जोशना लोमटे, शिवाजीराव खडसे, अजय खोडके, राजाभाई सुर्यवंशी, सुरेश राजहंस, लहु थोरात, श्रीकांत शिंदे, आदी शेकडो नेते व हजारों मातंग समाज बांधव उपस्थित होते.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय