Saturday, May 18, 2024
Homeराजकारणमाजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. सोमय्या यांच्या विरोधात राज्यातील अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेत ही विरोधकांनी सोमय्या यांच्या व्हिडिओचा मुद्दा उचलला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधानपरिषदेत या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावर सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही महिलेचा छळ झाला असेल, तर ते योग्य नाही. याबाबत सदस्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच महिलेची ओळख जाहीर न करता चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ चॅट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात सोमय्या हे अत्यंत घाणेरडे हावभाव करताना दिसत आहे. या संदर्भातील ‘लोकशाही मराठी’ या वाहिनीने बातमी दिली होती. या बातमीने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देखील व्हिडिओची सत्यता तपासाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी मागणी केली होती. यासंबंधीचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. त्यांनी त्यात म्हंटले आहे की, एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा :

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय