Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयजागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा निषेध; 45 दिवसांचा दिला अल्टिमेट

जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा निषेध; 45 दिवसांचा दिला अल्टिमेट

UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. परंतु अद्यापपर्यंत केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. संतप्त कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी निषेध आंदोलन केले. पोलिसांनीक कुस्तीपटूंना ताब्यात घेत अत्यंत हिन वागणूक दिल्याचे जागतिक कुस्ती महासंघाने म्हटले आहे. (Wrestling Federation of India)

जागतिक कुस्ती महासंघानं या आंदोलनाची दखल घेतली असून भारतीय कुस्ती महासंघटनाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्यानं निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघानं दिला आहे.

देशासाठी पटकावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आणि देशासह जगभरात खळबळ माजली होती. आता जागतिक कुस्ती महासंघाने दिलेल्या अल्टिमेट मुळे केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केली तर…?

जागतिक कुस्ती महासंघानं भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केला तर तर पुढच्या जागतिक स्पर्धेत आपल्या कुस्तीपटूंना भारताचे प्रतिनिधित्व न करता खेळावं लागणार.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय