पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : हिंदु धर्मात तुळशी विवाहाला धार्मिक महत्व आहे. तुळशी मातेसोबात भगवान विष्णूच्या शालीग्राम आवताराचा या दिवशी विवाह केला जातो. तुळशी विवाह नंतर हिंदु धर्मात लग्न समारंभ सुरु होतात. शहरात विविध ठिकाणी तुळशी विवाह मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
ओम गणेश हौसिंग सोसायटी काकडे टाऊनशिप केशवनगर चिंचवड येथे मध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यात मोठ्या प्रमाणात नागरिक तुळशी सह सहभागी झाले.
तुळस ही मांगल्याचे प्रतीक आहे. तसेच निसर्गातील पर्यावरण समृद्ध करणारी वनस्पती आहे. पूर्वजांनी तुळशी विवाहाच्या माध्यमातून तुळशीचे आरोग्य, पर्यावरण पूरक महत्व समजून घ्यावे यासाठी तुळशी विवाह संस्कार धर्म परंपरेत समाविष्ट केला आहे. प्रत्येकाने घरातील गच्चीत एका कुंडीत तुळस लावली तर शुद्ध प्राणवायू मिळू शकतो, असे सोसायटी अध्यक्ष, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे यांनी सामुदायिक तुळशी विवाहप्रसंगी सांगितले.
हा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात जल्लोषात पार पडला. यात महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती. यावेळी महिलांनी मंगल अष्टके महिलांनी गाऊन फुलांची सजावट केली होती.
याप्रसंगी अजित नाईक, अपर्णा राजहंस, रोहिणी बच्चे, अश्विनी नाईक, गीता कोरे, पुष्करणी देशपांडे, सुषमा निंबाळकर, सारीका जोशी, स्वाती विटुळे, वर्षा सोनार काकू, स्मिता सावंत, काजल बच्चे- गावडे, अश्विनी कलशेट्टी, मोनिका धर्माधिकारी, मोघे काकू, राजू कोरे, सुहास राजहंस, दीपक सावंत, मनोज जोशी, गोविंद देशपांडे, सागर धर्माधिकारी, अभिजित देशपांडे सर्व सोसायटी सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.