Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चांदवड तालुक्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा संपन्न, ‘दिग्गजांची उपस्थिती’

---Advertisement---

चांदवड, ता.३ : (सुनिल सोनवणे) : चांदवड येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, युवक महिला अध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, सुरज चव्हाण, प्रेरणा बलकवडे, भारती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---

चांदवड व देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्व प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कार्यकर्ता जीवाचं रान करून रस्त्यावर पक्षाचे झेंडे घेऊन उभा राहतो, विरोधकांची संघर्ष करून, विरोध पत्करून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचवतो व ते कार्य पक्षातील नेत्यांना पर्यंत पोहोचत असेल का? याचा विचार न करता कार्यकर्ता पाच वर्ष विरोधक असतांना देखील लढत राहिला त्यात कार्यकर्त्यांचा सन्मान व मनोबल वाढेल यासाठी ही यात्रा आहे.

पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिलेली कार्यकारणी खरंच मतदारसंघ तालुका व जिल्ह्यात कार्यरत आहे का? शरद पवार यांचे नाव घेऊन सुरु केलेलं कार्य खरंच चालू आहे का? याचा आढावा घेण्यासाठी ही परिसंवाद यात्रा आम्ही सर्व करत आहोत असे रूपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुक्यात विधानसभा क्षेत्रातील चांदवड व देवळा या तालुक्यातील सर्व प्रतिनिधी व तालुका अध्यक्ष यांची सविस्तर पणे माहिती घेतली. तसेच सर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस महिला राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांचे कार्य कसे चालू आहे, याबद्दल जाणून घेतले. सर्वांनी आता कामाला लागावे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कुठले ही मतभेद व मनभेद न ठेवता कसे निवडून येतील यावर सर्वांनी लक्ष द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत कसे पोहोचेल याचा सर्वांनी विचार करावा, पक्ष बांधणी करावी असा सल्ला विधानसभा क्षेत्रातील चांदवड व देवळा येथील सर्व कार्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमासाठी जिल्हा नेते श्रीराम शेटे, चांदवड तालुका अध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, देवळा तालुका अध्यक्ष दत्ता वाघचौरे, देवळा राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, सुनील कबाडे, विजय जाधव, नवनाथ आहेर, प्रकाश शेळके, सुखदेव जाधव, अल्ताफ तांबोळी, रघुअण्णा आहेर, यु के आहेर, रावसाहेब भालेराव, अमोल भालेराव, अनिल ठाकरे, रिजवान घाशी, दत्तू भोकनळ, पंडित बापू निकम, चांदवड तालुका महिला अध्यक्ष साधना पाटील हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles