Friday, April 26, 2024
Homeजिल्हादेशातील महागाई आणि बेरोजगारीकडे केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - डॉ.उदय नारकर

देशातील महागाई आणि बेरोजगारीकडे केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – डॉ.उदय नारकर

लातूर : देशातील जनतेला हरघडी महागाई, बेरोजगारीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जनतेला साह्य केले पाहिजे. परंतु पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात केंद्र सरकार सतत वाढ करून स्वतः केंद्र  सरकारच जनतेला लुटत आहे. या पदार्थांवरील केंद्राचा कर जिझिया कर आहे. सरकारने हा कर तातडीने अर्धा करावा, यासाठी जनतेने उग्र पण शांततामय आंदोलनास सिद्ध व्हावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. उदय नारकर म्हणाले. ते लातूर येथे लातूर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व पक्ष सभासद मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी विचारपीठावर लातूर जिल्हा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. सुधाकर शिंदे, लातूर तालुका सचिव कॉ. संजय मोरे, रेणापुर तालुका सचिव कॉ. डी.पी कांबळे उपस्थित होते. 

भाजप धर्मांधतेच्या अडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे ! – डॉ. अशोक ढवळे

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

नारकर म्हणाले, केंद्र सरकारच्या या जनता द्रोही धोरणाच्या विरोधात २५ ते ३१ मे च्या दरम्यान देशभरात डावे पक्ष निषेध आंदोलन करणार आहेत. सर्व भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी हाक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देत आहे.

त्याच बरोबर राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. ऊसाचे शेवटचे कांडे जाईपर्यंत कारखाने चालू राहतील, हे सरकारने दिलेले वचन पाळले पाहिजे. ते शक्य न झाल्यास दर एकरी ४० टन उत्पादन प्रमाण मानून एफ आर पी नुसार उसास नुकसानभरपाई दिली पाहिजे. अजून कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना झालेला नाही, येत्या खरिपाची तयारी सुरू आहे, रासायनिक खतांचे दर परवडत नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले पाहिजे.

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

यावेळी प्रेमगिर गिरी, सुरेश कातळे, रामराव गवळी, विश्वंभर भोसले, विक्रम गिरी, मन्सूरभाई कोतवाल, जीवनराव देशमुख, व्यंकटराव राऊतराव, ज्ञानोबा वळींग्रे, रामचंद्र बाबर, गोविंद कांबळे, डॉ. बी. टी देशमुख, दत्ता राऊतराव यांच्यासह लातूर जिल्ह्यातील पक्ष सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय