Saturday, July 2, 2022
Homeग्रामीणजुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी

जुन्नर : गणेशखिंड येथे आठ दिवसात दुसरा अपघात, 15 जण जखमी

जुन्नर : जुन्नर – मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील हा दुसरा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील शिनोली गंगापुर येथून MH. 14. AZ. 3965 या क्रमांकाची पिकप गाडी सरळगाव मुरबाड या ठिकाणी लग्नासाठी जात असताना पलटी झाली. या अपघातात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना आळेफाटा तसेच जुन्नर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे एपीआय परशुराव कांबळे घटनास्थळी दाखल झाले, तसेच ते पुढील घटनेचा तपास करत आहेत.

गेल्याच आठवड्यात 10 मे रोजी हातवीज येथून सितेवाडीला येताना पिकपचा भीषण अपघात झाला, या अपघातात दुर्दैवाने 4 वर्षांच्या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले होते.

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

जुन्नर मढ या मार्गावरील गणेशखिंड येथे गेल्या एक वर्षा पासून सातत्याने अपघात होत आहे, या मार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले, मात्र एका ठिकाणी तीव्र स्वरूपाचे उतार आणि वळण राहिल्याने या ठिकाणचा रस्ता झाल्यापासून येथे अपघात होत आहेत. या अपघाताच्या घटना सातत्याने होत असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय