Tuesday, May 7, 2024
Homeबॉलिवूडअभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने सुनावली "इतक्या" दिवसांची न्यायालयीन कोठडी

अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने सुनावली “इतक्या” दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. या प्रकरणी केतकीला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 

बुधवारी केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे तिला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय