Friday, April 26, 2024
Homeजिल्हाडॉ. राजेंद्र भारुड यांची झालेली बदली रद्द करा - राजेंद्र पाडवी

डॉ. राजेंद्र भारुड यांची झालेली बदली रद्द करा – राजेंद्र पाडवी

तळोदा : डाॅ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे बदली करण्यात आली  आहे. ही बदली रद्द करण्यात यावी यासाठी राजेंद्र पाडवी राज्य महासचिव बिरसा फायटर्स आणि राज्यातील अनेक बिरसा फायटर्स शाखा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. राजेंद्र भारुड यांची बदली ऐकून नंदुरबार वासीय तसेच अनेक आदिवासी बांधवांची नाराजी निर्माण झाली आहे. नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा अनेक वर्षापासून अजूनही दुर्लक्षित असून विकासापासून वंचित आहे. ब-याच वर्षांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यात डाॅ.राजेंद्र भारूड सारखे आदिवासी समाजाचे जिल्हाधिकारी जे आदिवासींच्या समस्या जाण असणारे जिल्हाधिकारी लाभले. डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे आदिवासींच्या समस्या माहिती आहेत आणि त्यादृष्टीने त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात चांगले काम सुरू होते.  

सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद प्रशासकीय कामगिरी बजावणा-या जिल्हाधिकारीची नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी अत्यंत गरज आहे.

नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नंदुरबार वासीय व आदिवासी जनतेच्या हिताचा व  भावनांचा विचार करून कर्तव्य दक्ष, आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असणा-या, नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक करून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात भर पाडणा-या डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे येथे झालेली बदली त्वरित  रद्द करावी व डाॅ.राजेंद्र भारूड यांना जिल्हाधिकारी नंदुरबार याच पदावर ठेवून सेवेची संधी द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय