Sunday, December 4, 2022
Homeग्रामीणसुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

सुरगाणा / दौलत चौधरी : राजमाता जिजाऊ पुरस्काराने सुचिता जाधव यांना सन्मानित करण्यात आले. अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ पुरस्कार जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीत निर्माण केली त्यांच्या आदर्शमुळे शिवरायांनी आदर्श महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केली अशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे काम केल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख  सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठी कार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव यांनी सांगितले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय