शहरातील बाजार पेठात मोकाट सांड फिरत असताना त्यांच्या झुंजी हाणामाऱ्या अनेक वेळा पाहायला मिळतात. अशाच दोन पिसाळलेल्या बैलांची झुंज बाजार पेठ ओलांडून रेल्वे फटकावर आली. (Bulls fighting)
हे बैल लढता लढता रेल्वे फाटक ओलांडून चक्क रूळावर जाऊन पोहोचले. तेवढ्यात पाठीमागून भरधाव वेगानं एक ट्रेन आली.आणि क्रॉसिंगच्या गेटमनची त्रेधतिरपीट उडाली, त्याने या झुंजणाऱ्या सांडाना आवरण्याचा प्रयत्न केला. (Bulls fighting)
तिकडून येत असलेल्या ट्रेनच्या मोटरमननं जोरदार हॉर्न वाजवून त्या बैलांना दूर हटण्याचा इशारा देखील केला. पण बैल काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. रुळाजवळ उभे असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लोको पायलटने सावधगिरी बाळगून वेळीच ट्रेन थांबवली. (Bulls fighting)
एकाने बैलांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सद्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले. हा व्हिडिओ कुठला आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे रुळावर बैलांची झुंज पाहताच रेल्वे लोको पायलटने ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवल्यामुळे दोन्ही बैलांचा जीव वाचला आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण