EARTHQUAKE : मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 10 जुलै रोजी पहाटे हिंगोली, नांदेड, परभणी आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. (Earthquake)
भूकंपाचे तीव्र धक्के हिंगोली जिल्ह्यात जाणवले. हिंगोलीच्या औंढा, हिंगोली, वसमत भागांत भूकंपाने हादरले. नांदेडमध्ये सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली. भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याचे समजते. या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले.
परभणीतही भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का जाणवला असून सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे होते. परभणीतील अनेक भागांत या धक्क्यांमुळे नागरिक घराबाहेर आले.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. तरीही, या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल