Sunday, December 8, 2024
Homeराष्ट्रीयNew delhi : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे बुडणार पैसे,...

New delhi : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे बुडणार पैसे, काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली / वर्षा चव्हाण– सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले. NCLATने जेट एअरवेजची मालकी जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम कडे सोपवण्याचा निर्णय दिला होता, त्यानंतर SBI आणि इतर कर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (New delhi)


आता सर्वोच्च न्यायालयाने संपत्ती विकण्याचा अंतिम निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर लाखो किरकोळ भागधारकांचे पैसे या कंपनीच्या शेअर्समध्ये अडकल्याने ते अडचणीत आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जेट एअरवेजचे शेअर्स बीएसईवर 5 टक्क्यांनी लोअर सर्किटवर बंद होऊन 34.04 रुपयांवर बंद झाले. 30 सप्टेंबरपर्यंत, किरकोळ भागधारक यांचा जेटमध्ये 19.29 टक्के हिस्सा आहे. (New delhi)

इतर प्रमुख भागधारकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (26 टक्के), इतिहाद एअरवेज (24 टक्के) आणि पूर्वीचे प्रवर्तक (25 टक्के) यांचा समावेश आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 386.69 कोटी आहे, त्यापैकी किरकोळ शेअर होल्डिंगचे मूल्य 74.6 कोटी आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय