Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याPune : धक्कादायक ! पुण्यात 'ऑनर किलिंग', आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : धक्कादायक ! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आंतरधर्मीय विवाहामुळे एका साडूने आपल्या साडूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येच्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (Pune)

अमीर शेख (वय 25) या तरुणाने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही घटना घडली. आरोपी पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने अमीर शेखची हत्या केली. अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केले होते, याचा राग मनात ठेऊन त्याने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे. (Pune)

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे केले आणि ते नदीपात्रात फेकले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना IPC कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

घटनेच्या अधिक तपासादरम्यान असे समजले की, 15 जून रोजी आरोपींनी अमीर शेखला दारू पिण्यासाठी बोलावले आणि त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. अमीर शेखची पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान हत्येचा उलगडा झाला. (Pune)

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी गणेश दिनेश गायकवाड अजूनही फरार आहे. पंकज विश्वनाथ पाईकराव, सुशांत गोपाळ गायकवाड, आणि सुनील किशन चक्रनारायण यांना अटक करण्यात आली आहे. गणेश गायकवाड फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Pune धक्कादायक घटना

या घटनेमुळे समाजात धर्म आणि जात या जोखडात अडकलेल्या लोकांमुळे किती गंभीर आणि धक्कादायक घटनांचा सामना करावा लागतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय