Sunday, May 19, 2024
Homeजिल्हालाचखोर तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

लाचखोर तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंदवण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. बुधवारी (दि.5) त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तलाठी संतोष शशिकांत जोशी (वय. 47) आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव (वय.51), दोघे रा. त्र्यंबकेश्वर यांनी तक्रारदाराकडे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने पडताळणी केल्यानंतर तलाठी कार्यालयात 2 हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्याने तेथे सापळा लावून थांबून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष दोघांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सदर कारवाईची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस.आर. कोहली यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय