Friday, April 26, 2024
Homeराजकारणब्रकिंग : पुण्यात शिवसैनिकांचा राडा, उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला

ब्रकिंग : पुण्यात शिवसैनिकांचा राडा, उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला

पुणे : माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार उदय सामंत पुण्याहून मुंबईकडे निघाले असता कात्रज चौकात त्यांची गाडी अडविण्यात आली, त्यावेळी सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक, चप्पलफेक करण्यात आली. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली. तसेच यावेळी गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याची माहिती आहे. सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार आहेत. या प्रकरणावरून शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

नक्की काय घडलं?

सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबलेला. यावेळेस इतर 5 गाड्यांमधून 20-25 जण आले. या सर्वांची गाडीवर हल्ला करण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांचीही सभा कात्रज येथे झाली. मात्र या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय