Saturday, May 18, 2024
Homeराज्यब्रेकिंग : पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

ब्रेकिंग : पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील खचकड सुनिल भगवान, हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.

आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय