Sunday, May 5, 2024
Homeहवामानमोठी बातमी : दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली, माळीणची पुनरावृत्ती

मोठी बातमी : दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली, माळीणची पुनरावृत्ती

रायगड : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 नागरिक असल्याचे समोर आलेय. प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. बचावकार्य अद्याप सुरु आहे.

इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून 151 जणांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता.

इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे. मलब्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय